Advertisement

किर्ती बनली ब्रिटीश कॅाप

रुपेरी पडद्यावरील कलाकारांना वास्तवातील स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असते. अभिनेत्री किर्ती कुल्हारीचंही कॅाप बनण्याचं स्वप्नं रुपेरी पडद्यानं साकार केलं आहे.

किर्ती बनली ब्रिटीश कॅाप
SHARES

रुपेरी पडद्यावरील कलाकारांना वास्तवातील स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असते. अभिनेत्री किर्ती कुल्हारीचंही कॅाप बनण्याचं स्वप्नं रुपेरी पडद्यानं साकार केलं आहे.


युनिफॅार्ममध्ये झळकणार 

आपण काहीतरी बनावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. सर्वसामान्य लोकांकडे एकच अॅाप्शन असतो, पण कलाकारांचं मात्र तसं नसतं. ते कलाकार बनले की त्यांच्यासाठी स्काय इज लिमीट बनतं. ते वास्तवात जे बनू शकत नाहीत ते रुपेरी पडद्यावर बनतात आणि त्यातच समाधान मानतात. अभिनेत्री किर्ती कुल्हारी लवकरच पोलिसांच्या युनिफॅार्ममध्ये पडद्यावर झळकणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका आगामी हिंदी चित्रपटात किर्ती पोलिसी खाक्या दाखवताना दिसणार आहे.


मिशन मंगल

या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित नसलं तरी हा चित्रपट 'द गर्ल आॅन द ट्रेन' या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या किर्तीचा 'मिशन मंगल' हा चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याच वातावरणात आलेली ही बातमी किर्तीच्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्री एका नव्या रूपात पाहण्याची संधी किर्तीच्या चाहत्यांना मिळणार आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबतची अधिक माहिती रिव्हील करण्यात आलेली नाही.


हटके अंदाज 

'द गर्ल आॅन द ट्रेन' हा अमेरिकन मिस्ट्री थ्रीलर ड्रामा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हॅालीवूडमधील आघाडीच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये किर्तीसोबत परीणीती चोप्राही दिसणार आहे. इतर कलाकारांची नावं अद्याप समजलेली नाहीत. यापूर्वी 'मायकल', 'युद्ध' आणि 'तीन' या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळं या चित्रपटात किर्तीचा काहीसा हटके अंदाज पहायला मिळेल यात शंका नाही.हेही वाचा  -

'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर

प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा