Advertisement

डेंग्यूने अडवली श्रद्धाची वाट!


डेंग्यूने अडवली श्रद्धाची वाट!
SHARES

अभिनेत्री श्रद्धा कपूरने मागील काही वर्षांपासून लक्षवेधी चित्रपटांचा जणू धडाकाच लावला आहे. ‘एक व्हिलन’, ‘एबीसीडी २’, ‘बागी’, ‘रॅाक आॅन २’, ‘हसीना पारकर’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘स्त्री’ चित्रपटाने श्रद्धाची चांगलीच चलती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, पण डेंग्यूने तिची वाट अडवली आहे.


सायनावर बायोपिक

काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकच्या शुटींगला सुरुवात केली होती. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले होते, पण श्रद्धा अचानक आजारी पडल्याने या चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागलं. हाती आलेल्या माहितीनुसार श्रद्धाला डेंग्यू झाल्याचं समजतं.


दोन दिवसांचा ब्रेक

मागील काही दिवसांपासून श्रद्धाची प्रकृती ठीक नव्हती. असं असतानाही तिने शूट सुरू ठेवलं. २७ सप्टेंबरला जेव्हा श्रद्धाने वैद्यकीय तपासण्या केल्या, तेव्हा तिला डेंग्यू झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर शूटिंगमधून ब्रेक घेत श्रद्धा सध्या आराम करत आहे. दोन दिवसांनी श्रद्धा पुन्हा सेटवर परणार असल्याचा अंदाज चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.


शुटींग सुरूच

अचानक उद्भवलेल्या श्रद्धाच्या आजारपणामुळे लेखक-दिग्दर्शक अमोल गुप्ते सध्या बालकलाकारासोबत सायनाच्या बालपणातील भाग चित्रीत करत आहेत. श्रद्धा लवकरच फिट होऊन सेटवर परतण्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. यंदा श्रद्धाचे ‘स्त्री’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

सायनाच्या या बायोपिकखेरीज ती ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत ‘साहो’ या चित्रपटातही दिसणार आहे. एका मागोमाग एक नवनवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचा श्रद्धाच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.हेही वाचा-

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!

‘हेलिकॅाप्टर’सह इंडियन आयडाॅलमध्ये पोहोचला अजयRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement