Advertisement

मी लेस्बियन नाही, राखीचा आरोप तनुश्रीने फेटाळला


मी लेस्बियन नाही, राखीचा आरोप तनुश्रीने फेटाळला
SHARES

तनुश्री दत्ता लेस्बियन आहे, तिने माझ्यावर बलात्कार केला आहे, असा आराेप आयटम गर्ल राखी सावंतने नुकताच एका पत्रकार परिषदेत केला होता. हे सर्व आरोप तनुश्रीने फेटाळून लावले आहेत.


काय म्हणाली तनुश्री?

राखी सावंतच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तनुश्री म्हणाली, ''जे छुप्या युद्धात माहीर आहेत, त्यांना मला असं सांगायचंय की दुसऱ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मी ड्रग अॅडिक्ट नाही, मी दारू पित नाही, मी लेस्बियन देखील नाही. मी तर या पितृसत्ताक आणि महिलाविरोधी समाजाचं ओझ वाहणारी महिला आहे. त्यामुळेच माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून मला गप्प करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत. समाजात बदल घडवून आणणाऱ्या अशा चळवळीची कुणीच थट्टा करता कामा नये.''


राखीचे आरोप

दोन दिवसांपूर्वी राखी सावंतने एक पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीवर आरोप केले होते की, तनुश्रीने तिच्यावर १२ वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. तनुश्री आतून पुरूष असून म्हणूनच तिने टक्कल केलं होतं. एवढंच नाही, तर तनुश्री ड्रग्ज घेतल्याचा आरोपही राखीने केला होता. तनुश्रीने आपल्यावर अब्रुनुकसानीचा दावा केल्यामुळेच आपण १२ वर्षे गप्प राहिल्यानंतर बोलत आहोत, असंही राखी म्हणाली होती.



हेही वाचा-

#MeToo: तनुश्री लेस्बियन, माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा आरोप

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा