Advertisement

अहानच्या लाँचिंगच्या तयारीत सुनील शेट्टी

आपल्या चिरंजीवाला लाँच करण्यात व्यग्र असल्यानं अभिनेता सुनील शेट्टी 'आता बस' या मराठी चित्रपटाच्या साँग लाँच सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. सुनील शेट्टीचा मुलगा अहानला बॅालीवुडचं दार खुलं करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त पार नुकताच पडला आहे.

अहानच्या लाँचिंगच्या तयारीत सुनील शेट्टी
SHARES

आपल्या चिरंजीवाला लाँच करण्यात व्यग्र असल्यानं अभिनेता सुनील शेट्टी 'आता बस' या मराठी चित्रपटाच्या साँग लाँच सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. सुनील शेट्टीचा मुलगा अहानला बॅालीवुडचं दार खुलं करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त पार नुकताच पडला आहे.

आजवर बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी आपल्या आई-वडीलांचा कित्ता गिरवत बॅालीवुडमध्ये एंट्री केली आहे. काहीजण यात यशस्वी झाले, तर काहींना हे क्षेत्र फारसं मानवलं नाही, पण आपल्या आई-वडीलांच्या किंवा स्वत:च्या इच्छेखातर का होईना बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी बॅालीवुडचा स्वाद चाखला आहे. कोणताही गॅाडफादर नसताना अभिनेता सुनील शेट्टीनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी आथिया हिनंही बॅालीवुडमध्ये एंट्री घेतली. आता वडील आणि बहिण यांच्या वाटेनं जात शेट्टीचा मुलगा अहानही चित्रपटसृष्टीत दाखल होत आहे.

शेट्टीचा मुलगा अहान आता एका वेगळ्या प्रवासाला निघाला आहे. 'आरएक्स १००' या चित्रपटापासून सुरू होणारी ही वाट त्याला हिंदी फिल्म इंडस्ट्रीकडं घेऊन जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण दक्षिण मुंबईतील एका थिएटरमध्ये सुरू करण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सेरेमनीही पार पडला आहे. या प्रसंगी सुनीलसह निर्माते साजीद नाडीयादवाला, तसंच दिग्दर्शक मिलन लुथ्रीया उपस्थित होते. मिलनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. मिलन यांनी यापूर्वी नेहमीच काहीसे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले असल्यानं या चित्रपटाकडूनही सर्वांच्याच फार अपेक्षा असणार आहेत.

'आरएक्स १००' हा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक अजय भूपती यांच्या मूळ तेलुगू भाषेतील चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या रोमँटिक-अॅक्शन चित्रपटात आहानच्या जोडीला 'स्टुडंट आॅफ द इयर २' फेम तारा सुतारीया मुख्य भूमिकेत आहे. साजिद नाडीयादवाला यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीच्या पटलावर आणखी एका स्टारपुत्राचा उदय होणार आहे. त्यामुळं केवळ शेट्टी कुटुंबासाठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीनंही हा फार महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.



हेही वाचा  -

गृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह

किशोरी बनल्या बिचुकलेची आई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा