Advertisement

अक्षय कुमारनं तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला...

तंबाखूच्या जाहिरातीमुळे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अक्षय कुमारनं तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला...
SHARES

तंबाखूच्या (tobacco brand) जाहिरातीमुळे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अक्षयनं तंबाखूची जाहिरात केली होती आणि त्यामुळेच त्याचे चाहते नाराज झाले आहेत. नेटकऱ्यांनी या जाहिरातीमुळे अक्षयला ट्रोल करायची संधी सोडली नाही.  

अक्षयनं या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे. “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे मी अस्वस्थ झालोय. मी तंबाखूचं समर्थन करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा मी सन्मान करतो”, असं त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये अक्षयने पुढे लिहिलं, “मी विनम्रतेनं या जाहिरातीतून माघार घेतो. या जाहिरातीतून मिळालेलं मानधन मी चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पद्धतींनुसार ब्रँडकडून ती जाहिरात ठरलेल्या वेळेपर्यंत दाखवली जाईल. पण भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जागरूक राहीन याचं आश्वासन देतो. या बदल्यात मला तुमच्याकडून फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवा आहे.”

अक्षय कुमारनं केलेल्या या जाहिरातीत त्याच्यासोबत अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण हे कलाकारसुद्धा होते. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती.हेही वाचा

अल्लू अर्जुनचा स्वॅग, नाकारली तंबाखू कंपनीची करोडोंची ऑफर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा