Advertisement

पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

पृथ्वीराज या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे.

पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत
SHARES

यशराज फिल्म्सनं अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या पृथ्वीराज या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे. ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारतोय. तर अभिनेता सोनू सूदचीही महत्त्वाची भूमिका चित्रपटात आहे. या चित्रपटाद्वारे माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेले रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेता संजय दत्तची झलकदेखील यात दिसतेय. तर संयोगिताच्या भूमिकेत मानुषी छिल्लरदेखील टीझरमध्ये दिसतेय.

अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त यांच्यासह आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या वर्षात म्हणजेच २१ जानेवारी २०२२ ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार गाजणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा