इम्रान हाश्मी-अमिताभ पहिल्यांदाच एकत्र

आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार आहेत.

  • इम्रान हाश्मी-अमिताभ पहिल्यांदाच एकत्र
SHARE

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीची देखील ही इच्छा पूर्ण होणार आहे. आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार आहेत. चेहरे’ असं या चित्रपटाचं नाव असून लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

नुकतीच या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली.  असून चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. इम्रान हाश्मीनेदेखील एक फोटो शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे. या चित्रपटामध्ये बिग बी आणि इम्रान हाश्मीव्यतिरिक्त अन्नू कपूर, रघुवीर यादव हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.


दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन रुमी जाफरी करणार आहे. तर निर्मिती आनंद पंडित करत असून चित्रपटाची निर्मिती मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट यांच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत.हेही वाचा-

अमिताभ मराठी चित्रपटात

... म्हणून हृतिकनं 'सुपर ३०' चित्रपटाची प्रदर्शन डेट पुढे ढकललीसंबंधित विषय
ताज्या बातम्या