Advertisement

अमिताभ बच्चन यांचा झुंड 'या' तारखेला होणार रिलीज

अमिताभ बच्चन यांच्या हातात एक फुटबॉल असून झुंड नही टीम कहीये असं म्हणटलं आहे.

अमिताभ बच्चन यांचा झुंड 'या' तारखेला होणार रिलीज
SHARES

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी फेसबुकला पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी हा चित्रपट तुम्हाला ४ मार्चला थिअटरमध्ये पाहायला मिळेल असं म्हणाले आहेत.

तसंच त्यांनी एक बॅनर शेअर केलं आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन स्पोर्टस लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या हातात एक फुटबॉल असून झुंड नही टीम कहीये असं म्हणटलं आहे.

कोरोना काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. झुंड हा चित्रपट तयार असताना सुध्दा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत रिलीज करण्यात आला नव्हता. मध्यतंरी अफवा सुध्दा पसरली होती, की हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवरती पाहायला मिळणार पण या सगळ्या अफवा असल्याचं नागराज मंजुळे यांनी सांगितलं होतं.

बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे.

नागराज मंजुळेंनी या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराज यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.

ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे. नागराज यांचं बॉलिवूडमधील पदार्पण कसं असेल किंवा चित्रपटात काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.



हेही वाचा

नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा