अमिताभ यांनी 'यासाठी' मानलं चाहत्यांचं आभार

दादा साहेब फाळके पुरस्काराची घोषणा होताच अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. या सगळ्या शुभेच्छा स्वीकारत अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

SHARE

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.  केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्काराची घोषणा होताच अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. या सगळ्या शुभेच्छा स्वीकारत अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बीग बींनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटलं की, 'कृतज्ञ हूं मैं , परिपूर्ण , आभार और धन्यवाद ... मैं केवल एक विनयपूर्ण , विनम्र अमिताभ बच्चन हूं।' अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुवर्णकमळ, शाल आणि १० लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

आतापर्यंत अमिताभ यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलं आहे.हेही वाचा

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

जेव्हा खरे पोलीस खोट्या पोलिसांना सलाम करतात…
संबंधित विषय
ताज्या बातम्या