Advertisement

‘राजमा चावल’ खाण्यासाठी पुन्हा हरयाणवी बनला अपारशक्ती


‘राजमा चावल’ खाण्यासाठी पुन्हा हरयाणवी बनला अपारशक्ती
SHARES

आमिर खान अभिनीत बहुचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट जवळजवळ सर्वांनीच पाहिलेला आहे. या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांच्या जोडीला आणखी एक व्यक्तिरेखा चर्चेत राहिली. ही व्यक्तिरेखा होती अपारशक्ती खुरानाने साकारलेल्या हरयाणवी तरुणाची. हाच अपारशक्ती पुन्हा एकदा हरयाणवी भूमिका साकारताना दिसणार आहे.


 ‘या' चित्रपटात हरयाणवी रूपात

‘दंगल’मध्ये अपारशक्तीने आमिरसोबत साकारलेला ओमकार रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला होता. हरयाणवी भाषेचा हेल अचूकपणे पकडत ओमकारने हरयाणवी तरुणाची भूमिका मोठ्या खुबीने साकारली होती. आता ‘राजमा चावल’ या आगामी हिंदी चित्रपटात पुन्हा तो हरयाणवी रूपात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लीना यादव यांनी केलं आहे.


'याचा फायदाच झाला'

एखादी विशिष्ट प्रकारची व्यक्तिरेखा पुन: पुन्हा साकारल्याने साचेबद्ध भूमिकांमध्ये बंदिस्त होण्याची भीती अनेकांना वाटत असते, अपारशक्ती मात्र याकडे सकारात्मक द़ृष्टिकोनातून पाहतो. कोणत्याही भूमिकेशी एकरूप होणं गरजेचं असल्याचं अपारशक्तीचं म्हणणं आहे. ‘दंगल’साठी हरयाणवी भाषा आणि लहेजा शिकल्याचा फायदा अपारशक्तीला ‘राजमा चावल’साठीही झाला आहे.


अपारशक्ती म्हणतो...

ही व्यक्तिरेखा जरी हरयाणवी असली तरी ‘दंगल’पेक्षा खूप वेगळी असल्याचं अपारशक्तीचं म्हणणं आहे. तो म्हणतो, प्रादेषिक भाषेतील एखादी व्यक्तिरेखा साकारताना केवळ ती भाषाच शिकता येत नसून, त्या निमित्ताने त्या भाषेशी निगडीत असलेली संस्कृतीही आत्मसात करता येते. त्यामुळे अशा प्रकारच्या विविधांगी व्यक्तिरेखा साकारताना मला वेगळाच आनंद मिळतो आणि या आनंद प्रेक्षकांनाही उपभोगता येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा