Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

'मस्सकली 2.0'वर चाहत्यांसोबतच ए. आर. रेहमानही भडकले

नुकत्याच रिलीज झालेल्या मस्सकली 2.0 हे गाणं देखील रिमिक्सच आहे. पण जुन्या गाण्याचा रिमेक पाहून ए.आर. रेहमान यांनी संताप व्यक्त केला.

'मस्सकली 2.0'वर चाहत्यांसोबतच ए. आर. रेहमानही भडकले
SHARES

हल्ली जुनं गाणं घेऊन त्याचं रिमिक्स बनवायची क्रेझच आली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या मस्सकली 2.0 हे गाणं देखील रिमिक्सच आहे. दिल्ली ६ मधील सोनम कपूरवर चित्रीत करणारं मस्सकली मस्सकली हे गाणं सर्वांच्या चांगलंच लक्षात असेल. आता याच गाण्याचा रिमेक देखील आला आहे. पण सध्या हे गाणं सोशल मीडियावर फार ट्रोल होत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची जोडी या रिमेक गाण्यात पाहण्यास मिळत आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला नापसंती तर दिलीच आहे. शिवायचाहत्यांसोबतच मुळ गाण्याच्या निर्मात्यांना देखील हे आवडलेलं नाही. हे गाणे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिल्ली-6’ चित्रपटातील मसक्कली गाण्याचे रिमेक आहे. मूळ गाण्याला संगीतकार एआर रेहमान यांनी म्यूझिक दिलं होतं. तर गीत प्रसून जोशी यांनी लिहिलं आहे.


मसक्कली 2.0 गाणे रिलीज झाल्यानंतर एआर रेहमान यांनी देखील सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिलं की, कोणतेही शॉर्ट कट्स वापरले नाहीत, असंख्य रात्री न झोपता, वारंवार लिहिलं. २०० पेक्षा अधिक संगीतकार, ३६५ दिवसांच्या क्रिएटिव्ह ब्रेनस्टोरमिंगचा उद्देश हा होता की असं संगीत निर्माण करणं, जे अनेक पिढ्या चालेल.


आपल्या या ट्विटमध्ये रेहमान यांनी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि गीतकार प्रसून जोशी यांना देखील टॅग केले. त्यांनी देखील रेहमान यांच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवला. मेहरा यांनी ट्विट केले की, प्रेम आणि उत्कटतेने हे गाणे तयार केले आहे. रिमिक्स तुमचे कान खराब करतील, सावध रहा.

प्रसून जोशी यांनी ट्विट केलं की, दिल्ली-6 साठी लिहिलेली मसक्कलीसह सर्वच गाणी ह्रदयाच्या जवळची आहेत. अशाप्रकारे मुळ गाण्याचा वापर केलेला पाहून दुःख होते. आशा आहे की चाहते नक्कीच मुळ गाण्याच्या बाजूनं उभे राहतील.

गायक मोहीत चौहान, अभिनेत्री सोनम कपूर, गायिका श्रेया घोषाल आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली.

तर अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलनं पण मस्सकलीच्या रिमेकवर टिका केली आहे. हेही वाचा

बॉलिवूड कलाकारांनी मानले पोलिसांचे आभार, मुंबई पोलिसांची फिल्मी उत्तरं

१६ हजार मजुरांच्या पाठिशी भाईजान, 'अशी' केली आर्थिक मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा