Advertisement

'भारत'ने मोडला ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्याच चित्रपटांचे विक्रम

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बाजी मारली आहे. या चित्रपटानं यापूर्वी ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांचे रेकॅार्ड मोडले आहेत.

'भारत'ने मोडला ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्याच चित्रपटांचे विक्रम
SHARES

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बाजी मारली आहे. या चित्रपटानं यापूर्वी ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांचे रेकॅार्ड मोडले आहेत.


बक्कळ कमाई

सलमान खान आणि कतरीना कैफची मुख्य भूमिका असलेला 'भारत' ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना इतकी उत्सुकता होती की, पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बाजी मारत बक्कळ कमाई केली आहे. याखेरीज यंदा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही 'भारत' सर्वाधिक ओपनिंग देणारा चित्रपट बनला आहे. 'भारत'चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबतच सलमान-कतरीनाच्या चाहत्यांसाठीही ही खूप मोठी खुशखबर मानली जात आहे. पहिल्या दिवशी सकाळी पहिल्या शोपासूनच सलमानच्या फॅन्सनी 'भारत' पाहण्यासाठी गर्दी केल्यानं या चित्रपटानं विक्रमी गल्ला जमवण्यात यश मिळवलं आहे.


ईदचा मुहूर्त 

२०१० पासून जवळजवळ दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याला २०१३ हे वर्ष अपवाद आहे. या चित्रपटांनी पहिल्या दिवसापासूनच बॅाक्स आॅफिसवर आपली पकड मजबूत करत लक्षवेधी कमाई केल्याचं आकडे सांगतात. आजवर ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांनी पहिल्या दिवशी केलेल्या व्यवसायावर एक नजर टाकल्यास समजतं की, २०१० मध्ये 'दबंग'नं १४.५० कोटी, २०११ मध्ये 'बॅाडीगार्ड'नं २१.६० कोटी, २०१२ मध्ये 'एक था टायगर'नं ३२.९३ कोटी, २०१४ मध्ये 'किक'नं २६.४० कोटी, २०१५ मध्ये 'बजरंगी भाईजान'नं २७.२५ कोटी, २०१६ मध्ये 'सुलतान'नं ३६.५४ कोटी, २०१७ मध्ये 'टयुबलाईट'नं २१.१५ कोटी, तर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेस ३' या चित्रपटानं २९.१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


४२.३० कोटींचा गल्ला

या सर्व चित्रपटांना मागे टाकत 'भारत'नं पहिल्याच दिवशी ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या रेसमध्ये 'भारत'नं यंदा जानेवारीपासून आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही मागं टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी 'कलंक'नं २१.६० कोटी, 'केसरी'नं २१.०६ कोटी, 'गली बॅाय'नं १९.४० कोटी, तर 'टोटल धमाल'नं १६.५० कोटी रुपये कमावले आहेत. 'भारत'बाबत तयार झालेलं वातावरण आणि रिव्हील झालेले सलमानचे विविध लुक्स यांनी चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाल्यानं पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतात ४७००, तर भारताबाहेर १३०० स्कीन्ससह जगभरात जवळजवळ ६००० हून जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झाल्याचा फायदाही 'भारत'ला झाला आहे.



हेही वाचा  -

रुपेरी पडद्यावर झळकणार छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव'

बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा