Advertisement

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं दाखल

कपूर परिवारानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं दाखल
SHARES

प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावली असून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कपूर परिवारानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे आम्ही बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली. रणधीर यांच्याकडे अधिक विचारणा केली असता, ऋषीची तब्येत बिघडली असली तरी तो निश्चितच बरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात ऋषीसोबत पत्नी नितू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा