Advertisement

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान रुग्णालयात दाखल

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करावं लागलं.

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान रुग्णालयात दाखल
SHARES

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करावं लागलं. श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.

सरोख खान यांच्या निकटवर्तीयनं टाईम्सला माहिती दिली की, "काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं  त्या रुग्णालयात गेल्या होत्या. आम्हाला त्यांची काळजी वाटत होती. पण नशीब कोरोना नसल्याचं समोर आलं. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडलं जाईल."

सरोज खाननं बॉलिवूडमध्ये हिट गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे.

१९८३ साली त्यांनी 'हिरो' चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केलं. नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 'कलंक' हा आहे. याशिवाय त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.



हेही वाचा

काम बंद असल्यामुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कसतोय शेती

सुशांतच्या बायोपिकचं पोस्टरही आलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा