Advertisement

निशांत बनला रॅाजर बिन्नी

आज सगळीकडे चर्चा आहे दिग्दर्शक कबीर खान यांच्या '८३' या आगामी हिंदी चित्रपटाची. या चित्रपटातील कलाकारांच्या टिमनं धर्मशालामध्ये क्रिकेटचा कसून सराव केला आहे. अशातच या चित्रपटात निशांत दहियाची एंट्री झाल्याची बातमी आली आहे.

निशांत बनला रॅाजर बिन्नी
SHARES

आज सगळीकडे चर्चा आहे दिग्दर्शक कबीर खान यांच्या '८३' या आगामी हिंदी चित्रपटाची. या चित्रपटातील कलाकारांच्या टिमनं धर्मशालामध्ये क्रिकेटचा कसून सराव केला आहे. अशातच या चित्रपटात निशांत दहियाची एंट्री झाल्याची बातमी आली आहे.


यशाची गाथा

१९८३ मध्ये विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं लिहिलेल्या यशाची गाथा '८३'मध्ये पाहायला मिळणार आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत रणबीर सिंग दिसणार आहे. इतर क्रिकेटर्सच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचीही निवड झाली आहे. यात रॅाजर बिन्नी यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निशांत दहियाला निवडण्यात आलं आहे.


बिन्नींच्या भूमिकेसाठी निवड

बलविंदर यांनी जेव्हा निशांतला पहिला चेंडू टाकताना पाहिलं, तेव्हाच त्यांनी बिन्नींच्या भूमिकेसाठी त्याची निवड पक्की केली. निशांत यापूर्वी 'केदारनाथ' दिसला होता. आता तो '८३' या चित्रपटात अष्टपैलू रॅाजर बिन्नींची भूमिका साकारणार आहे. '८३'च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवच्या माध्यमातून याची घोषणाही करण्यात आली आहे. 'निशांत दहिया हा रॅाजर बिन्नींच्या भूमिकेत दिसणार आहे, जे '८३' विश्वचषक संघातील प्रमुख विकेटटेकर होते', असं ट्विट करण्यात आलं आहे. 


अष्टपैलू कामगिरी

बिन्नींनी नेहमीच अष्टपैलू कामगिरी बजावत फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. बिन्नी यांनी १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाचे १८ गडी बाद केले होते. या चित्रपटातील कलाकारांनी धर्मशाला येथे नुकतंच पाच दिवसांच्या आठवड्याचं सराव सत्र तीन दिवसात पूर्ण केलं आहे. या दरम्यान खऱ्या क्रिकेटर्सची शैली कलाकारांना शिकवण्यात आल्याचं निशांतचं म्हणणं आहे. या शिबिरात कपिल देव यांच्यासोबत मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा आणि मदन लाल यांनी कलाकारांना क्रिकेटचे धडे दिले.हेही वाचा -

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबईसह महाराष्ट्रात ५७ टक्के मतदानसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा