रणबीर-आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'ची प्रदर्शन तारीख पुढे ढकलली


SHARE

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची शूटिंगसुद्धा संपली आणि या वर्षाअखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचं स्पष्ट केलं आहे.


२०२० मध्ये प्रदर्शित 

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २०१९ नाही २०२० मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटातील संपूर्ण टीम आणि व्हीएफएक्स टीम ग्राफिक्स आणि साऊंड्सच्या कामात व्यग्र आहे. एक दमदार चित्रपट बनवण्यासाठी टीम दिवसरात्र झटत आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. २०२० च्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू. प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्यानंतरच तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल,’ असे अयाननं सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्ट केलं आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. तर या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.हेही वाचा -

रणवीरचा ‘८३’, तर शाहरुखचा क्लास ऑफ ‘८३’!

निशांत बनला रॅाजर बिन्नी
संबंधित विषय
ताज्या बातम्या