Advertisement

देशासाठी पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन


देशासाठी पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन
SHARES

१९८३ मध्ये दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या भानु अथैया यांचं गुरुवारी निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. भानु यांनी कॉश्च्युम डिझायनर म्हणून १०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केलं होतं. भानु यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं भानु यांच्या मुलीनं सांगितलं. ८ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. गेली ३ वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. भानु यांना अर्धांगवायू झाला होता.

भानु यांचा जन्म कोल्हापुरात झाला होता आणि १९५६ मध्ये गुरुदत्त यांच्यासोबत त्यांनी 'सीआयडी' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरचे पहिले काम केले होते. आमिर खानच्या 'लगान' आणि शाहरुख खानच्या 'स्वदेस' या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचं काम केलं होतं.



हेही वाचा

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ईडीची चार ठिकाणी कारवाई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा