Advertisement

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ईडीची चार ठिकाणी कारवाई


सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ईडीची चार ठिकाणी कारवाई
SHARES

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला उलटून आता कित्येक महिने उलटले. मात्र पोलिसांचा तपास अद्याप सुरूच आहे. या आत्महत्या प्रकरणावरून सोशल मिडिया आणि नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा आजही रंगवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सक्तवसुली संचलनालय(ईडी)ने चार ठिकाणी शोध मोहिम राबवली. चित्रपट निर्माता दिनेश वीजन यांच्याशी संबंधीत ठिकाणावर ही शोधमोहिम राबवण्यात आल्याचे  सूत्रांनी दिली.

हेही वाचाः-  बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

ईडीने याप्रकरणी दिनेश यांची गेल्या महिन्यात चौकशी केली होती. त्यांनी सुशांत सिंगचा राबता चित्रपट दिग्दर्शीत केला होता. सुशांत सिंग व दिनेश यांच्यातील काही वित्तीय व्यवहारांची माहिती ईडीला पाहिजे असल्यामुळे त्यांनी याप्रकरणी शोध मोहिम राबवली. याबाबत दिग्दर्शक दिनेश विजन यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दिनेश यांनी लव आज कल, कॉकटेल, बदलापूर, गो गोवा गॉन व बिईंग सायरस सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिनेश यांचा राबता हा चित्रपट ९ जून २०१७ मध्ये प्रदर्शिक झाला होता. त्यात सुशांत सिंग राजपुतसह क्रीती सॅनॉन यांनी प्रमुख भूमिका होत्या.

हेही वाचाः- मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

दिनेश विजन व राजपूत यांच्यात दोन प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात होते. पण त्याचे व्यवहार झाले की नाही, याबाबत ईडी सध्या तपास करत आहे. याप्रकरणी दिनेश यांच्या मुंबईतील घरासह चार ठिकाणी ईडीने शोध मोहिम राबवल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंगची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेल्याचे असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पुढे मनी लाँडरींगप्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा