Advertisement

दीपिकाला ओळखलंत का?

छपाक' असं शीर्षक असलेल्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात दीपिका अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघनानं दीपिकाला जेव्हा या सिनेमाची कथा ऐकवली होती, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते.

दीपिकाला ओळखलंत का?
SHARES

आजच्या काळातील आघाडीच्या सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणनं नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. ग्लॅमरस भूमिकांइतक्याच तिच्या नॅान ग्लॅमरस भूमिकाही खूप गाजल्या आहेत. आता 'छपाक' या आगामी सिनेमात दीपिकाचा एक वेगळाच लुक पहायला मिळणार आहे. हा लुक इतका वेगळा आहे की, प्रथमदर्शनी ही दीपिकाच आहे की अन्य कोणी असा क्षणभर संभ्रम होतो.


अश्रू अनावर झाले 

'राजी' सिनेमात आलिया भट्टला भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत सादर केल्यानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार दीपिकासोबत काम करणार असल्याची बातमी यापूर्वीच आली आहे. 'छपाक' असं शीर्षक असलेल्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात दीपिका अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघनानं दीपिकाला जेव्हा या सिनेमाची कथा ऐकवली होती, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. या सिनेमाच्या निमित्तानं दीपिका आणि मेघना प्रथमच एकत्र काम करणार आहेत.


अॅसिड हल्ल्याचा बळी 

अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींच्या व्यथा मांडणाऱ्या 'छपाक'मध्ये दीपिका लक्ष्मी अग्रवाल नावाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. वयाच्या १५ व्या वर्षी अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मीचा जीवनसंघर्ष या सिनेमात पाहायला मिळेल. लग्नाला नकार दिल्यानं तिच्यावर अॅसिड फेकण्यात आलं होतं. आजवर बऱ्याच कलाकारांनी अॅसिड हल्ल्याचा बळी ठरलेल्या तरुणींनी विविध प्रकारे धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, पण मेघना प्रथमच त्यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.


निर्मिती क्षेत्रात पहिलं

या सिनेमाच्या निमित्तानं प्रेक्षकांना दीपिकाचं दुहेरी रूप पाहायला मिळेल. मुख्य भूमिकेसोबतच दीपिका या सिनेमाची निर्मिही करत आहे. या निमित्तानं दीपिकानं निर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. दीपिकाच्या के. ए. एन्टरटेन्मेंटसोबत फॅाक्स स्टार स्टुडिओज आणि मेघनाच्या मृग फिल्म्सच्या बॅनरखाली 'छपाक'ची निर्मिती करण्यात येणार आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सिनेमात दिपीकाच्या पतीची भूमिका विक्रांत मेस्सी साकारणार आहे.  होळीच्या मुहूर्तावर दिल्लीमध्ये 'छपाक'च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.



हेही वाचा - 

... तर पॅार्नस्टार बनली असती कंगना

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा