Advertisement

अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते.

अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन
SHARES

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. अस्लम खान यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दोघांचेही कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

तर एहसान खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप कुमार यांचे भाऊ आणि त्यांचं कुटुंबिय त्यांच्यापासून जवळच वास्तव्यास आहे. दिलीप कुमार यांच्या घरी त्या दोन्ही कुटुंबियांचं नित्यनेमाने जाण-येणं सुरू असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन अशा चौघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या चाैघाही जणांना एकापाठोपाठ एक करत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर या चौघांनाही घरी सोडण्यात आलं. दरम्यानच्या काळात अमिताभ यांच्या प्रकृतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा मीडियात रंगल्यामुळे अमिताभ यांनी सोशल मीडियावरून आपला रागही व्यक्त केला होता. बच्चन कुटुंबिय लवकरात लवकर बरं व्हावं, अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून करण्यात येत होती.

हेही वाचा- एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा