Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

बॉलिवूड (Bollywood)चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे...

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये
SHARE

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात चिंतादायक वातावरण पसरलं आहे. जगभरातील देशांनी घबरदारी म्हणून लॉक डाऊनची घोषणा केली आहे. मुंबईत देखील काही कार्यालयांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जण स्वत:ला व्हायरसपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक सेलिब्रिटिजनी स्वत:ला लॉक डाऊन केलं आहे. यामध्ये बॉलिवूड (Bollywood)चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचंही नाव आहे.


घाबरू नका...

दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. घाबरू नका, दिलीप कुमार सुखरूप आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दिलीप कुमार यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे याआधीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसोलेशनमध्ये ठेवल्यानं त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही.


काय म्हणाले दिलीप कुमार?

दिलीप कुमार यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं की , 'कोरोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.'

दिलीप कुमार यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसंच स्वतःला इतरांपासून वेगळं करण्याच्या त्यांचा निर्णय योग्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक हॉलिवूड स्टार्सना झाला आहे. टॉम हक्स, रीटा विल्सन, ओल्गा कुरिलेंको, लुईस सेपुलवेडा अशा काही स्टार्सचा यात समावेश आहे.


मुंबईत पहिला बळी

कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे जगभरात या आजाराबद्दल भिती व्यक्त केली जात आहे. मुंबईत देखील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका ६४ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशातील हा तिसरा मत्यू आहे.हेही वाचा

Coronavirus Updates: करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद

कोरोना व्हायरसमुळे सुर्यवंशी चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलली

संबंधित विषय
संबंधित बातम्या