Advertisement

'गो गोवा गॉन २'चा लवकरच सिक्वेल, यावर्षी सुरू होणार शूटिंग

‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. तुम्ही तयार आहात या सिक्वेलसाठी. जाणून घ्या या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल...

'गो गोवा गॉन २'चा लवकरच सिक्वेल, यावर्षी सुरू होणार शूटिंग
SHARES

गो गोवा गॉन या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हो अगदी बरोबर ओळखलंत. तब्बल आठ वर्षानंतर म्हणजे मार्च २०२१ मध्ये ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे.  ही माहिती मॅडॉक फिल्म्सनं ट्विटरद्वारे दिली. आपल्या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले की, "जॉम कॉम चित्रपटाच्या सिक्वेलसाठी सज्ज राहा." 


'चुचा'ची वर्णी?

मॅडॉक फिल्मस गो गोवा गॉनच्या पहिल्या भागातील सर्व पात्रे परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्यांचं फायनल ड्राफ्टवर काम सुरु असून सप्टेंबर २०२० पासून चित्रीकरणाला सुरूवात होईल. चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर अभिनेता वरुण शर्मानं देखील ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे तो देखील या चित्रपटात एखादी भूमिका करणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अशी आहे कथा?

गो गोवा गॉन चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा अशी आहे की, ३ मित्र गोव्याला फिरायला जातात. गोव्यातल्या एका आयलँडवर ते रात्री पार्टीला जातात.  पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते जॉम्बीमध्ये घेरलेले असतात. या जॉम्बीपासून ते स्वत:ची सुटका करतात. कसे बसे ते आयलँड सोडून गोव्याच्या किनाऱ्यावर येतात. पण तिकडे देखील सगळं अस्ताव्यस्त असतं. इथूनच गो गोवा गॉन चित्रपटाचा दुसरा भाग सुरू होईल.

प्रेक्षकांना आतुरता

गो गोवा गॉन चित्रपटाची घोषणा होताच ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. अनेकांनी चित्रपटाचं स्वागत केलं.

२०१३ मध्ये आलेल्या गो गोवा गॉनच्या पहिल्या भागात सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत होते. सध्या तरी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटात कोणा-कोणाची वर्णी लागणार हे अजून स्पष्ट नाही.हेही वाचा 

...म्हणून रितेश देशमुखनं मानले अजित पवारांचे आभार

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील आलियाचा जबराट लूक रिलीज

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement