Advertisement

'या' दिवशी प्रदर्शित होतोय फरहान अख्तरचा तुफान

रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं आहे.

'या' दिवशी प्रदर्शित होतोय फरहान अख्तरचा तुफान
SHARES

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या तुफानचा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १६ जुलै रोजी ग्लोबल प्रीमिअर होणार आहे. रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं आहे.

'तुफान' हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. भारत आणि जगभरातील २४० हून अधिक देशांत हा चित्रपट बघता येणार आहे.

या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांच्यासह सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

'भाग मिल्खा भाग' या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी 'तुफान' मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे.

ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द आहे. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.हेही वाचा

कोविड रिलिफ फंडसाठी चिंगारीचा पुढाकार, 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट'चे आयोजन

अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा