Advertisement

डिसेंबरमध्ये अक्षय देणार 'गुड न्यूज'


डिसेंबरमध्ये अक्षय देणार 'गुड न्यूज'
SHARES

येत्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज घेऊन येणार आहे. ही गुड न्यूज आहे त्याच्या चित्रपटाविषयी. २७ डिसेंबर रोजी ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे.


ट्वीटरवर घोषणा

अक्षयनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘दबंग ३’ ला टक्कर देण्यासाठी आणखी एक चित्रपट सज्ज झाला आहे. अक्षय आणि करिनासोबतच यामध्ये दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी, जिमी शेरगिल, अंजना सुखमानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


मिशन मंगल

'गुड न्यूज’ नंतर अक्षय कुमार लवकरच ‘मिशन मंगल’ आणि ‘हाऊसफुल ४’मध्ये झळकणार आहे. तर करीना कपूर ‘तख्तन’ या चित्रपटातून अनिल कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.



हेही वाचा

विकीचा उधमी लुक पाहिला का?

आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा