Advertisement

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही इरफानची छाप, 'या' सिनेमांचं झालं खूप कौतुक

जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही इरफानची छाप, 'या' सिनेमांचं झालं खूप कौतुक
SHARES

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खाननं बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.  अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता.

 जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ हे त्याचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. त्याला हासिल (निगेटिव्ह रोल), 'लाइफ इन अ मेट्रो' (बेस्ट अॅक्टर), 'पान सिंह तोमर' (बेस्ट अॅक्टर क्रिटिक) आणि 'हिंदी मीडियम' (बेस्ट अॅक्टर) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 'पान सिंह तोमर'साठी राष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.  

प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट

  • ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी)
  • एक डॉक्टर की मौत
  • ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी)
  • द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी)
  • द वॉंरियर (इंग्रजी)
  • नेमसेक (इंग्रजी)
  • पानसिंग तोमर
  • मकबूल
  • रोग
  • रोड टु लडाख (लघुपट)
  • लाईफ ऑफ पाय (इंग्रजी)
  • लाईफ इन मेट्रो (इंग्रजी)
  • सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी)
  • सलाम बॉंबे
  • स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी)
  • हासिल

दूरचित्रवाणी मालिका

  • चंद्रकांता
  • चाणक्य
  • डर
  • भारत एक खोज

पुरस्कार

  • पद्मश्री - २०११
  • फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार - २००३ (हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी
  • फिल्मफेअर  सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार - २००७ (लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी)
  • राष्ट्रीय चित्रपट पुुरस्कार सर्वोत्तम अभिनेता - २०१२ पानसिंग तोमर चित्रपटाकरिता

हेही वाचा - 

अभिनेता इरफान खान यांचं निधन

‘या’ दिग्दर्शकाने सर्वात आधी दिली इरफानची दु:खद बातमी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा