Advertisement

जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, चित्रपटाचे शूटिंग थांबवले

अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणा-या अभिनेत्री शबाना आझमी यांनाही कोरोना झाला आहे.

जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, चित्रपटाचे शूटिंग थांबवले
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग तातडीनं थांबवण्यात आलं आहे.

अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणा-या अभिनेत्री शबाना आझमी यांनाही कोरोना झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी शबाना आझमी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता जया बच्चन यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे करण जोहरनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२० मध्ये जया बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी जया बच्चन सुरक्षित होत्या, मात्र यावेळी त्या देखील कोविडपासून वाचू शकल्या नाहीत.

दुसरीकडे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाबद्दल बोलायचे तर गेल्यावर्षीच करण जोहरनं या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. कोरोनामुळे करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवले आहे.



हेही वाचा

अमिताभ बच्चन यांचा झुंड 'या' तारखेला होणार रिलीज

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा