Advertisement

शाहिदला 'वटवाघूळ' म्हणाला कमाल!

म्हणतात ना, ज्याला कावीळ होते, त्याला सर्व काही पिवळंच दिसू लागतं. तसंच काहीसं कमाल आर. खानच्या बाबतीत म्हणावं लागेल. एखाद्या कलाकारानं सोशल मीडियावर काही कमेंट केली किंवा आपला एखादा नवीन लुकमधील फोटो टाकला की कमालची त्यावर कमेंट आलीच म्हणून समजा...

शाहिदला 'वटवाघूळ' म्हणाला कमाल!
SHARES

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत'मध्ये राजा रतन सिंगची भूमिका साकारणारा शाहिद कपूर आता 'कबीर सिंग' बनला आहे, पण कमाल खाननं त्याला वटवाघूळाची उपमा दिली आहे.


स्वत:चंच म्हणणं खरं 

म्हणतात ना, ज्याला कावीळ होते, त्याला सर्व काही पिवळंच दिसू लागतं. तसंच काहीसं कमाल आर. खानच्या बाबतीत म्हणावं लागेल. एखाद्या कलाकारानं सोशल मीडियावर काही कमेंट केली किंवा आपला एखादा नवीन लुकमधील फोटो टाकला की कमालची त्यावर कमेंट आलीच म्हणून समजा... याच कारणामुळं नेहमी वादात अडकणारा कमाल नेहमी नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करण्याच्या प्रयत्नात असतो. एखाद्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती नसलेल्या कमालनं आता शाहिद कपूरला चक्क वटवाघूळ म्हटलं आहे.


कबीर सिंगचं पोस्टर शेअर

'कबीर सिंग' या आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शाहिदनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.  या चित्रपटात शाहिद अतिशय वेगळ्याच रूपात दिसतो. उनाड, दारूडा, बेफिकीर असं त्याचं रूप त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळं वाटतं. डोळ्यांवर काळा गॅागल, काळा टीशर्ट आणि विस्कटलेले केस अशा रूपातील 'कबीर सिंग'चं पोस्टर शाहिदनं शेअर केल्यावर कमालनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर तो 'चमदागड' म्हणजेच 'वटवाघूळा'सारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. असं म्हणून कमालनं एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे यात शंका नाही. आता शाहिद त्याला प्रत्युत्तर देतो की, चिखलात दगड मारून तो आपल्या अंगावर उडवून घेण्यापेक्षा गप्पच राहणं पसंत करतो ते पाहायचं आहे.


२१ जूनला प्रदर्शित

'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद एम्समधील एका एक्स स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये शाहिद एका दारूड्या सर्जनच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याच्या गर्लफ्रेंडचं अन्य कोणाशी लग्न झाल्यावर तो स्वत:ला उद्ध्वस्त करू पाहात असतो. या चित्रपटात कियारा अडवाणी त्याची नायिका बनली आहे. २१ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन संदिप रेड्डी बंगा यांनी केलं आहे. या चित्रपटातील काही भागासाठी शाहिदनं वजनही कमी केलं असून, नंतर ते खूप वाढवलंही आहे. तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा हा हिंदी रिमेक आहे.



हेही वाचा -

जाहिरातबाजीतही रणवीर-दीपिका अव्वल

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा