Advertisement

तर मी एकालाही सोडणार नाही : कंगना

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' या सिनेमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेला प्रतिआव्हान देत राजपूती बाणा दाखावला आहे. कंगनाचा 'मणिकर्णिका' २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

तर मी एकालाही सोडणार नाही : कंगना
SHARES

"तर मात्र मी एकालाही सोडणार नाही," असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेला प्रतिआव्हान देत राजपूती बाणा दाखावला आहे. कंगनाचा 'मणिकर्णिका' २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


करणी सेनेचा विरोध

राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री कंगना रणौत मागील काही दिवसांपासून 'मणिकर्णिका' या आगामी हिंदी चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. कठोर मेहनतीने बनवलेल्या 'मणिकर्णिका' या सिनेमाला करणी सेनेने विरोध केल्याने कंगना चांगलीच खवळली आहे. 'मणिकर्णिका'मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगनाने एखाद्या योद्ध्याप्रमाणे करणी सेनेच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


सेन्सॉरचा हिरवा कंदील

चार इतिहासकारांसह सेन्सॉर बोर्डानंही 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असताना करणी सेनेच्या आक्षेपाचं कारणच काय? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. करणी सेनेकडून येणाऱ्या धमक्या जर थांबल्या नाहीत, तर मात्र मी एकालाही सोडणार नाही. मी देखील एक राजपूत आहे, अशा कठोर शब्दांमध्ये कंगनाने करणी सेनेचा समाचार घेतला आहे.



म्हणून विरोध

करणी सेनेने 'मणिकर्णिका' या सिनेमाला विरोध केला आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवलं असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. चित्रपटातील एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना नृत्य करताना दाखवणं हे असभ्यतेचं असल्याचं करणी सेनेचं म्हणणं आहे. या सिनेमात आक्षेपार्ह दृश्य दाखवली असतील, तर निर्मात्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पत्रात देण्यात आल्याचं मिळालेल्या माहितीवरून समजतं.


कंगनाचा राजपूती बाणा

या पत्राखेरीज कंगनालाही करणी सेनेकडून धमक्या मिळाल्या असल्याचं समजतं. करणी सेनेच्या धमक्यांना न घाबरता कंगनानेही प्रतिआव्हान देत आपला राजपूती बाणा दाखवला आहे. करणी सेनेच्या आडून अन्य एखाद्या राजकीय शक्तीकडून 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' या सिनेमाला विरोध केला जात आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहेत. कंगनाच्या या वक्तव्यानंतर करणी सेना कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

युथट्यूब'द्वारे निर्मितीकडे वळले मधुराणी-प्रमोद

बटाट्याच्या चाळीत ‘भाई’ उत्तरार्धचा ट्रेलर लाँच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा