Advertisement

कतरीनाही बनली निर्माती

काही दिवसांपूर्वी कतरीनानं 'ही लव्हज मी ही लव्हज मी नॅाट' या फ्रेंच चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत. पण त्यानंतर काही कारणास्तव या प्रोजेक्टच्या कामाला गती मिळू शकली नाही. आता या चित्रपटाचं काम वेगात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कतरीनाही बनली निर्माती
SHARES

आज बॅालीवुडमधील बरेच आघाडीचे अभिनेते चित्रपट निर्मितीही करत आहेत. यात अभिनेत्रीही मागं नाहीत. या यादीत आता कतरीना कैफचंही नाव सामील होणार आहे.


फ्रेंच चित्रपटाचे अधिकार

कतरीना सध्या मुख्यत: दोन चित्रपटांमुळे लाइमलाईटमध्ये आहे. एक म्हणजे सलमान खानसोबतचा 'भारत' आणि दुसरा म्हणजे अक्षय कुमारसोबतचा 'सूर्यवंशी'. 'भारत' ५ जूनला रिलीज होणार आहे, तर 'सूर्यवंशी'चं शूटिंग अद्याप संपलेलं नाही. अशातच कतरीना चित्रपट निर्मितीकडं वळली असल्याचीही बातमी आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कतरीनानं 'ही लव्हज मी ही लव्हज मी नॅाट' या फ्रेंच चित्रपटाचे अधिकार खरेदी केले आहेत. पण त्यानंतर काही कारणास्तव या प्रोजेक्टच्या कामाला गती मिळू शकली नाही. आता या चित्रपटाचं काम वेगात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


या वर्षी शूटिंग सुरू

सध्या 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या कतरीनानंच चित्रपट निर्माती बनल्याच्या रहस्यावरून पडदा बाजूला सारत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. एका फ्रेंच चित्रपटाची निर्मिती करणार असल्याबाबत विचारण्यात आल्यावर कतरीना म्हणाली की, त्या फ्रेंच चित्रपटाच्या स्टोरीवर आम्ही मागील काही दिवसांपासून काम करत आहोत. खरं तर ही फ्रेंच फिल्म नाही, पण त्याच्या काही आयडीयाज माझ्यापर्यंत आल्या. मला त्या खूप आवडल्या आणि त्या चित्रपटात निर्माती म्हणून स्वत:चं नाव नमूद व्हावं असं वाटलं. पुढील कामाबाबतची बोलणी सध्या सुरू आहेत. त्यानंतर या वर्षी शूटिंग सुरू होणं अपेक्षित आहे.


दीपिकाही निर्मितीकडं

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीचं चित्रपट निर्मितीकडं वळणं ही नवीन गोष्ट नाही. प्रियांका चोप्रानं पर्पल पेबल पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रादेषीक चित्रपटांची निर्मिती केली आहे. क्लिन स्लेट फिल्म्सच्या बॅनरखाली अनुष्का शर्मा चित्रपटनिर्मिती करत आहे. स्वरा भास्करची कहानीवाले ही कंपनीही चित्रपट निर्मितीत व्यग्र आहे. याखेरीज दीपिका पदुकोणही 'छपाक'च्या निमित्तानं चित्रपट निर्मितीकडं वळली असून, आगामी '८३' या चित्रपटाची ती सहनिर्माती आहे. यांच्या पावलावर पाऊल ठेवत कतरीना सिनेनिर्मितीकडं वळली असली तरी ती भारतीय चित्रपटांची निर्मिती कधी करते ते पहायचं आहे.




हेही वाचा -

विठूराया १२ बलुतेदारांच्या रुपात देणार दर्शन

नवाज-मौनीच्या ‘बोले चुडीयां’चं पोस्टर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा