डायरीतल्या ‘त्या’ पानांनी सुशांतचे रहस्य उलघडले, बाॅलीवूड ते हाॅलीवूडचा असा करणार होता प्रवास

२०२० मध्येही काय करायचे आहे. त्याचा सर्व आराखडा त्याने त्याच्या डायरीत आखून ठेवला होता.

डायरीतल्या ‘त्या’ पानांनी सुशांतचे रहस्य उलघडले, बाॅलीवूड ते हाॅलीवूडचा असा करणार होता प्रवास
SHARES

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर  एकच खळबळ उडाली. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत असताना. आता सुशांत सिंहच्या डायरीतील  १५ पानांनी खळबळ उडवून दिली आहे. या पानांवर सुशांतने आपल्या कारकीर्दीविषयी आणि भविष्यातील आयुष्याबाबत  नियोजन करून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुशांतने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतची  ब्ल्यू प्रिंट काढली होती. २०२० मध्येही काय करायचे आहे. त्याचा सर्व आराखडा त्याने त्याच्या डायरीत आखून ठेवला होता. या डायरीत सुशांतची बहीण प्रियांकाचेही नाव आहे आणि त्याबरोबर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करावे याचा उल्लेख आहे.


सुशांतने त्याच्या डायरीत निळ्या पेनाने एक चार्ट बनावला होता. त्यात त्याच्या गरजा आणि  लक्षाबाबत लिहिले आहे. या सर्व गोष्टीवरून असे प्रश्न आता उपस्थित होत आहे की, जो आपल्या भविष्याचा ऐवढा विचार करू शकतो. तो अचानक आत्महत्येचा पाऊल कसे काय उचलू शकतो. डायरीच्या या पानांमध्ये सुशांतने आपल्या बॉलिवूड, हॉलिवूड आणि कंपनीच्या स्क्रिप्ट्सविषयीही लिहिले आहे. चित्रपटातील अभिनय प्रभावी करण्यासाठी, कोणते  प्रयोग आणि पद्धत वापरली पाहिजे. तसेच त्याची तयारी कशी करेल, हेही या पानांमध्ये लिहिलेले आहे.



सुशांतने लिहिलेल्या डायरीतून असे निदर्शनास येते की, चित्रपटसृष्टीतील पटकथा लिहिणाऱ्या लेखकांची लिस्ट काढून  त्या लेखकांची चांगली स्क्रिप्ट ओळखून काम करावे.  त्याच बरोबर चित्रपट बहुचर्चित करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तेही लिहून ठेवले होते. तसेच डायरीच्या या पानांमध्ये सुशांतने हॉलिवूडमध्ये जाण्याची पूर्ण योजना लिहून ठेवली. त्याशिवाय सुरवातीच्या काळामधील गुंतवणूकीचा विषय, कुटुंबातील कोणत्या सदस्यांना कोणत्या जबाबदा ऱ्या द्याव्या लागतील आणि कंपनी कशी वाढवायची या सर्व गोष्टींचे नियोजन त्याने डायरीत लिहून ठेवले होते.

त्याच बरोबर चित्रपटातील अभिनय आणखी प्रभावी करण्यासाठी त्याने काय करायला हवं, तसेच हे काम करताना त्याला कोणत्या समस्य उद्भवू शकतात. त्या डायरीत त्याने असे म्हटलं आहे की, ‘आप जो कहते हैं वह उतना ही महत्वपूर्ण है, जितना आप करते हैं।‘ तसेच भविष्यातील त्याच्या कंपनीत त्याने त्याची बहिण प्रियांकावर टिम संभाळण्याची जबाबदारी देणार होता. कॅमेरा फेस करताना, तुम्ही तुमचे डाँयलाँग  आठवू नका, तर ते अनुभवा आणि कॅमेऱ्यासमोर बोला.  या डायरीतील पानांमधील आशय पाहता. अशा व्यक्तीच्या डोक्यात आत्महत्येचा विषय येऊच कसा शकतो असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  काही दिवसांपूर्वी रियानेही  सुशांतच्या डायरीतील एक पान वायरल केले होते. त्यात तिने सुशांतच्या मनात तिच्या कुटुंबियाविषयी असलेली कृतज्ञता लिहीली होती.

हेही वाचाः- मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण

हेही वाचाः- राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच, दिवसभरात ३४४ जणांचा मृत्यू तर १२ हजार ७१२ नवे रुग्ण


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा