Advertisement

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन
SHARES

एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.

जयराम कुलकर्णी यांचा अल्पपरिचय

 • जन्म 17 ऑक्टोबर 1932
 • जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव.
 • जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.
 • गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्यानं कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली.
 • महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला.
 • कॉलेज शिक्षणा नंतर १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली.
 • नाटकात कामं करण्याची हौस असल्यानं १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
 • शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्यानं नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला.
 • सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या.
 • परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या.
 • पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या.
 • जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ हेमा कुलकर्णी, तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशानं वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून.हेही वाचा

Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement