Advertisement

कंगना आणि तिच्या बहिणीची चौकशी करा, कोर्टाचे मुंबई पोलिसांना निर्देश

चौकशीचा प्राथमिक अहवाल ५ डिसेंबरपर्यंत कोर्टात सादर करा, असंही न्यायाधीश भागवत झिरपे यांनी पोलिसांना बजावलं आहे.

कंगना आणि तिच्या बहिणीची चौकशी करा, कोर्टाचे मुंबई पोलिसांना निर्देश
SHARES

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. एखाद्या समाजाबद्दल सोशल मीडियावर द्वेषपूर्ण आणि अवमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी कंगना, तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची चौकशी करा, असे आदेश मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टानं गुरूवारी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

चौकशीचा प्राथमिक अहवाल ५ डिसेंबरपर्यंत कोर्टात सादर करा, असंही न्यायाधीश भागवत झिरपे यांनी पोलिसांना बजावलं आहे.

काही दिवसांपूर्वी तबलिगी समाजाबद्दल कंगनाची बहीण रंगोलीनं द्वेषयुक्त आणि अपमानकारक ट्विट केलं होतं. याविरोधात अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी केवळ सोशल मीडियावरील तिची सेवा खंडित केली.

याप्रकरणी आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनानं एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता, ज्यात तिनं रंगोलीचं समर्थन केलं होतं. याविरोधात अॅड. देशमुख यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यानं पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं.

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद शहरातील एका वस्तीमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यात अनेक आरोग्य कर्मचारी जखमी झाले.

या घटनेनंतर कंगनाची बहिणी आणि व्यवस्थापक गंगोली हिनं अत्यंत आक्षेपार्ह ट्विट करत विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं होतं. या हल्लेखोर लोकांना तिने 'दहशतवादी' संबोधले होते. यावरचं न थांबता अशा हल्लेखोरांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. रंगोली हिच्या या ट्विटमुळे वातावरण खूपचं तापलं. त्यामुळे ट्विटरने तिचं अकाउंट सस्पेंड केलं.



हेही वाचा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराला जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रात मराठीच 'बिग बॉस', जान कुमार सानूनं मागितली माफी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा