Advertisement

... म्हणून अभिनेता रणवीर शौरीची कार जप्त, मुंबई पोलिसांनी दिलं 'हे' उत्तर

म्हणून जप्त केली रणवीर शौरीची कार, संतप्त रणवीर शौरीनं ट्विटरवर व्यक्त केली नाराजी, पोलिसांनी दिलं हे उत्तर...

... म्हणून अभिनेता रणवीर शौरीची कार जप्त, मुंबई पोलिसांनी दिलं 'हे' उत्तर
SHARES

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा (coronavirus update) आकडा वाढत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पोलिस देखील रस्त्यावर किमान रहदारी असावी यासाठी प्रयत्न करत आहेत. सोशल डिस्टंसिंग अधिक पाळलं जावं यावर देखील पोलिसांचा अधिक भर आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत अनेकांना मदत देखील करत आहेत.  

पण चित्रपट अभिनेता रणवीर शौरीनं (ranveer shorey) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्विटर हँडलला टॅग करत तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यानं म्हटलं आहे की, आपत्कालीन घरगुती कामासाठी वापरली जाणारी माझी कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना हा प्रश्न विचारला आहे की, प्रसुती ही आपत्कालीन परिस्थिती नाही का?


गाडी जप्ती दरम्यान रणवीर शौरी त्यांच्या कारमध्ये नव्हते तर घरात होते. पण त्यांच्या घरात काम करणारा नोकर त्या गाडीत होता. शौरीनं ट्विटमध्ये म्हटलं की, "माझ्या घरात नोकरी करणार्‍या नोकराची बायको तीन दिवसांपूर्वी बाळंत झाली. तिच्या बाळंतपणासाठी तीन दिवसांपूर्वी मी माझी महिंद्रा एसयूव्ही ही कार त्याला दिली होती. जवळपास तीन दिवनसांनंतर माझा नोकर त्याच कारनं घरी येत होता. तेव्हा त्याची कार अडवण्यात आली आणि जप्त केली गेली."

ट्वीट माध्यमातून त्यानं सांगितलं की, "मी माझी परिस्थिती त्यांना सांगितली तरी जोगेश्वरी महामार्ग पोलिस चौकीतले विजय कदम यांनी एफआयआर दाखल करून कार ताब्यात घेतली. इतर अदिकारी परिस्थिती समजून घेऊन सहानुभूती दर्शवतात. पण विजय कदम यांनी एफआयआर दाखल करत कार जप्त केली."  

रणवीरनुसार कोणत्याही डिलीव्हरी केसला आपत्कालीन समस्या समजलं गेलं पाहिजे. तो म्हणाला की, मी या चांगल्या कामासाठी माझी कार दिली होती. आता मला हे सर्व झेलावं लागत आहे. मी अपेक्षा करतो की पोलिसांना माझं हे बोलणं समजेल आणि लवकरच मला माझी कार परत मिळेल.

रणवीर शौरीच्या ट्विटनंतर पोलिसांनी देखील त्याला ट्विटरद्वारे उत्तर दिलं. पोलिसांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, सर, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही तुमचा नंबर आम्हाला डायरेक्ट मेसेज करा.



हेही वाचा

जान्हवी कपूरच्या घरात कोरोनाचा शिरकाव, कुटुंब झाले क्वारंटाईन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा