Advertisement

'घूमकेतु'चा टिझर रिलीज, डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची धूम

एक मजेदार विनोदी-कथा अशी पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाचा संपूर्ण कुटुंबासह आनंद घेता येऊ शकतो.

'घूमकेतु'चा टिझर रिलीज, डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची धूम
SHARES

सध्या देशभरात कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थात चित्रपटगृहे देखील बंद आहेत. पण लॉकडाऊनच्या आधी चत्रपटाचं शूटिंग झालं आणि एप्रिल-मे मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट आता लटकले आहेत. पण निर्माता-दिग्दर्शकांना आता नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं आहे. त्यामुळे अनेक निर्माता-दिग्दर्शक डिजिटल माध्यम हा पर्याय निवडत आहेत.   

डिजिटल क्षेत्रातील अनेक चॅनल प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करत आहेत. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी 5 देखील प्रेक्षकांच्या अदिक पसंतीस उतरत आहे. आता ZEE 5 वर लवकरच 'घुमकेतू' पाहायला मिळणार आहे. "घुमकेतू" चा प्रीमियर जाहीर झाला तेव्हापासून प्रत्येकजण २२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. एक मजेदार विनोदी-कथा अशी पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाचा संपूर्ण कुटुंबासह आनंद घेता येऊ शकतो. चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.

टीझरची सुरूवात नवाजुद्दीन सिद्दीकी उर्फ घुमकेतू या इच्छुक लेखकासोबत होते. तो स्वप्न नगरी मुंबईमध्ये पाऊल ठेवतो. आपली स्वप्न मूर्ण करण्यासाठी एका नवीन शहरात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्याच्या दिलखुलास आणि मजेदार स्वभावामुळे तो हसत हसत समस्यांवर मात करतो.

अनुराग कश्यप देखील यात एक भूमिका साकारताना दिसत आहे. तो यामध्ये एका भ्रष्ट पोलिसाची भूमिका साकारत आहे. ज्याला घुमकेतू नावाच्या एका गुंड्याला शोधण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. एक दिवस, एक माणूस तक्रार नोंदवण्यासाठी येतो. पण त्याला कुणी गंभीरपणे घेत नसतं. पण जसं तो आपलं नाव घुमकेतू असल्याचं सांगतो तसं एकच गोंधळ उडतो. इन्स्पेक्टर म्हणजेच अनुराग कश्यपचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही! टीझर संपण्यापूर्वी, यात अमिताभ बच्चन, रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासह काही बहुप्रतिक्षित कलाकारांची झलक पाहायला मिळते.

पुष्पेंद्र नाथ मिश्रा दिग्दर्शित आणि फॅंटम फिल्म्स आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क निर्मित हा चित्रपट ZEE 5 वर पाहायला मिळणार आहे. येत्या २२ मे ला चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुले घरबसल्या तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

इरफान खानचा अंग्रेजी मीडियम हा चित्रपट लॉकडाऊन दरम्यान अॅमेझॉनवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर गुलाबो-सिताबोचा देखीलप्राईमवर प्रदर्शित होणार आहे. आता घूमकेतू देखील डिजिटल माध्यमवर पाहायला मिळेल. 



हेही वाचा

अमिताभ-आयुष्मान यांची 'गुलाबो सिताबो' अमेजॉन प्राइम होणार प्रदर्शित

चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचा खोटा मेसेज व्हायरल, सलमान संतप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा