Advertisement

नोरा-विकीचा 'पछताओगे'

विकी कौशलची सध्या चांगलीच चलती आहे. जॅान अब्राहमची लकी मॅस्कॅाट म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेहीही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता हे दोन कलाकार एकत्र आले आहेत.

नोरा-विकीचा 'पछताओगे'
SHARES

विकी कौशलची सध्या चांगलीच चलती आहे. जॅान अब्राहमची लकी मॅस्कॅाट म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता हे दोन कलाकार एकत्र आले आहेत.


मादक डान्स

'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'च्या यशानंतर रसिकांना विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचे वेध लागले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाटला हाऊस'मध्ये नोरा फतेहीनं 'साकी साकी...'चा सूर आळवत केलेला मादक डान्सही प्रेक्षकांना चांगलाच भावल्यानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा तिला नव्या रूपात पहायचं आहे. रसिकांची ही इच्छा दोघांनी एकत्र येत पूर्ण केली आहे. 'पचताओगे' या म्युझिक व्हिडीओमध्ये नोरा आणि विकी यांची जोडी जमली आहे.


विश्वासघातकी कथा

फर्स्ट लुक पिक्चर्स असो, बीटीएस व्हिडिओ असो, वा टीझर... भूषण कुमार यांनी नेहमीच काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी 'पछताओगे' या म्युझिक व्हिडीओची घोषणा केली असून, त्यात नोरा फतेही आणि विकी कौशल्य एकत्र दिसणार आहेत. बी प्रेक यांनी संकलित केलेल्या सर्व प्रेम कहाण्यांचा अंत एंडिंग नसतो आणि हृदयस्पर्शी भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यात एक हृदयविदारक आणि विश्वासघातकी कथा आहे. जानी यांनी लिहिलेलं गीत अरिजित सिंगनं आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे.


भावनिक व्हिडिओ

भयंकर भावनांनी भरलेला आणि प्रणयरम्यपणे तुटलेला हा भावनिक व्हिडिओ अरविंदर खैरा यांनी दिग्दर्शित केला आहे. नोरा फतेही आणि विक्की कौशल या जोडप्याच्या माध्यमातून कोमल आठवणींनी हळवं झालेलं, तसंच विश्वासघातामुळं दुखावलेले हृदयाचे दोन पैलू दाखवण्यात आले आहेत. खैरा यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेमाची एक वेगळीच व्याख्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.हेही वाचा -

अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
संबंधित विषय
Advertisement