Advertisement

अँड ऑस्कर गोज टू..., भारताला 'या' श्रेणीत मिळाला पुरस्कार

सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसस्थित डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

अँड ऑस्कर गोज टू..., भारताला 'या' श्रेणीत मिळाला पुरस्कार
SHARES

सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसस्थित डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ऑस्करचे हे ९४ वे वर्ष होते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ड्यून या चित्रपटाचा बोलबाला होता.

भारताकडून रायटिंग विथ फायर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत स्पर्धेत होता, मात्र हा लघूपट ऑस्कर आपल्या नावी करु शकला नाही.

मात्र तरीदेखील एक आनंदाची बातमी आहे. ‘ड्यून’मधील सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी भारतीय नमित मल्होत्राला पुरस्कार मिळाला. DNEG चे CEO, VFX कंपनी ज्याने Dune साठी अकादमी पुरस्कार जिंकला आहे. नमित हा बॉलिवूड प्रोड्युसर नरेश मल्होत्रा यांचा मुलगा आहे.

या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्टचे काम भारतातील नमित मल्होत्रा यांच्या कंपनीने केले आहे. त्यामुळे हा मान भारताला मिळाला आहे. भारतासाठी हा ऑस्करमधील मोठा क्षण ठरला आहे.

ड्यून चित्रपटाला ऑस्करमध्ये तब्बल ११ नामांकनं मिळाली, त्यापैकी सहा पुरस्कारांवर या चित्रपटानं आपले नाव कोरले आहे. तर अभिनेता विल स्मिथ हा सर्वोत्कृष्ट अभिनेत आणि जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत 'द समर ऑफ सोल'नं ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले. भारताच्या पदरी निराशा पडली.

वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ चित्रपटानं सहा पुरस्कार जिंकले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार चित्रपटानं पटकावले.

यंदाच्या ऑस्करमध्ये कोडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी ‘कोडा’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.

'कोडा' चित्रपटासाठी ट्रॉय कोटसर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ५३ वर्षीय कोटसर यांचा हा पहिला ऑस्कर आहे. पुरस्कार घेताना त्यांनी सांकेतिक भाषेतून लोकांशी संवाद साधला आणि हा पुरस्कार कोडा समाजाला समर्पित केला.

जपानच्या 'ड्राईव्ह माय कार'ने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर जिंकला. या श्रेणीत फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनाना: अ याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड यांना नामांकन मिळाले होते.

'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर स्वीकारताना विल स्मिथ भावूक झाला होता. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

याशिवाय हुमा कुरेशीच्या 'आर्मी ऑफ द डेड'ला फॅन्स चॉइस अवॉर्ड मिळाला आहे. 'बेलफास्ट' चित्रपटासाठी केनेथ ब्रानाघ यांना सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा पुरस्कार मिळाला.

'द लाँग गुडबाय' या चित्रपटाला लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा अकादमी पुरस्कार मिळाला आहे. जेनी बेवनला 'क्रुएला'साठी सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइनचा पुरस्कार मिळाला आहे.हेही वाचा

R R R : रामायण, राष्ट्रप्रेम, राजामौली

‘द कश्मीर फाइल्स’ दंगल चित्रपटचा विक्रम मोडू शकतो

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा