Advertisement

‘द कश्मीर फाइल्स’ दंगल चित्रपटचा विक्रम मोडू शकतो

‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रम मोडू शकतो.

‘द कश्मीर फाइल्स’ दंगल चित्रपटचा विक्रम मोडू शकतो
SHARES

‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रम मोडू शकतो.

‘दंगल’ चित्रपटानं भारतात सुमारे ४०० कोटींची कमाई केली होती. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं अवघ्या ११ दिवसांत तब्बल १७९.८५ कोटींची कमाई केली आहे.

जेव्हापासून चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून गुगल ट्रेंड्सवर भारत 3 ते 4 नंबरवर राहिला आहे. ट्विटरवरदेखील #thekashmirfiles टॉप ट्रेंडवर आहे. गेल्या सात दिवसांत या प्रकरणांशी संबंधित मुद्दे आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविषयी जाणून घेण्यामध्ये बरीच वाढ झाली.

आयनॉक्स सिने चेनचे सीईओ आलोक टंडन सांगतात, “रिलीजच्या पहिल्या दिवशी ४० हजार तिकिटांची विक्री झाली. आता दररोज अडीच लाख तिकिटांची विक्री होते. आतापर्यंत २० लाख तिकिटे विकली आहेत."

तरण आदर्श सांगतात, "अनेकदा मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत घाऊक किमतीत त्यांचे चित्रपट पडद्यावर प्रदर्शित करून १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करतात. येथे या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीतून साडेतीन हजारांहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या आहेत."



हेही वाचा

The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर Me Tooचे आरोप

सुशांतसिंगला आंतरराष्ट्रीय सन्मान, साजरा होणार ‘सुशांत मून’ दिवस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा