Advertisement

सुशांतसिंगला आंतरराष्ट्रीय सन्मान, साजरा होणार ‘सुशांत मून’ दिवस

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला आंतरराष्ट्रीय पातळीवर खास सन्मान दिला जात आहे.

सुशांतसिंगला आंतरराष्ट्रीय सन्मान, साजरा होणार ‘सुशांत मून’ दिवस
SHARES

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला आंतरराष्ट्रीय पातळीवर खास सन्मान दिला जात आहे.

अमेरिकेची लुनार सोसायटी सुशांतसिंग राजपूत याचा जन्मदिवस ‘सुशांत मून’ म्हणून साजरा केला जाणार आहे. २१ जानेवारी २०२३ पासून या उपक्रम सुरू होत असल्याचं समजतंय.

सुशांतला अंतराळाची विशेष ओढ होती. त्यातही त्याला चंद्राचे फार आकर्षण होते. चंद्र, तारे निरीक्षणासाठी त्याने खास दुर्बीण बसवली होती. इतकेच नव्हे तर चंद्रावर जमीन खरेदी करणारा तो एकमेव बॉलीवूड स्टार होता. इन्स्टाग्रामवर त्यानं चंद्रावरच्या त्याच्या प्रॉपर्टीचे फोटो शेअर केले होते.

इतकेच नव्हे तर त्याने ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट साईन केला होता ज्यात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार होता. त्यासाठी नासानं त्याला प्रशिक्षण दिले होते. पण सुशांतच्या अचानक मृत्यूमुळे हा चित्रपट चित्रित होऊ शकला नाही.

अमेरिकन लुनर सोसायटीनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर केलेल्या घोषणेनुसार २१ जानेवारी २०२३ पासून हा दिवस ‘सुशांत मून’ म्हणून साजरा होणार आहे. हा ऐतिहासिक वार्षिक इव्हेंट बनेल अशी आशा सोसायटीनं व्यक्त केली आहे.



हेही वाचा

श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर, 'ही' आहे तारीख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा