Advertisement

The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर Me Tooचे आरोप

अभिनेत्री तनुश्री दत्तानं त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर Me Tooचे आरोप
SHARES

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सिनेमा बनवतानाचा त्यांचा दृष्टीकोन, विचारसारणी यामुळे चर्चेत असणाऱ्या विवेक इग्निहोत्रींवर मी टूचा (Me too) आरोप लागला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तानं (Tanushree Dutta) त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

तनुश्री दत्तानं विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू’चे आरोप केले. हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तनुश्रीनं २००५ मध्ये चॉकलेट सिनेमा केला होता. यावेळी विवेक यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागणी केल्याचा आरोप तनुश्रीचा आहे.

यावेळी अभिनेता इरफान खान आणि सुनिल शेट्टीनं आपली बाजू घेतल्याचा दावाही तनुश्रीचा आहे.

तिच्या या आरोपांवर विवेक (Vivek Agnihotri) यांनीही स्पष्टीकरण दिलं. तनुश्रीनं पब्लिसिटीसाठी हे आरोप केले असल्याचं विवेक यांचं म्हणणं आहे.

काही दिवसांआधी तनुश्रीनं डीएनए या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. तेव्हा तिने केलेले आरोप सध्या व्हायरल होत आहेत.

काही दिवसांआधी तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावरही आरोप केले होते. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. नाना पाटेकर यांनी या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिनं केला होता.

चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणं अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगतील तसं करण्यास सांगितलं, असा खळबळजनक आरोप तनुश्रीनं नाना पाटेकरांवर केला होता.हेही वाचा

सुशांतसिंगला आंतरराष्ट्रीय सन्मान, साजरा होणार ‘सुशांत मून’ दिवस

‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर, 'ही' आहे तारीख

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा