'ह्या' कारणासाठी परिणीती दोन महिने राहणार सर्वांपासून दूर

'द गर्ल ऑन द ट्रेन'ची ही कहाणी एका घटस्फोटित तरुणीची आहे जी लंडनमध्ये राहते. ती रोज ट्रेनमधून आपल्या ऑफिस आणि घरापर्यंतचा प्रवास करते. योगायोगानं ट्रेन तिच्या जुन्या घराच्या जवळूनच जाते.

SHARE

चित्रपटासाठी बॉलिवूड कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. भूमिकेला न्याय देता यावा यासाठी ते काही ना काही प्रयोग करत असतात. आता हेच बघा ना अभिनेत्री परिणीती चोप्रा चित्रपटातील भूमिकेसाठी चक्क दोन महिने सर्वांपासून लांब एकटी राहणार आहे. लवकरच ती हॉलीवुड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या रीमेकमध्ये झळकणार आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि तयारीसाठी ती पुढचे दोन महिने इंग्लंडमध्ये घालवणार आहे. ती जुलैमध्ये इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.


मिस्ट्री थ्रिलर चित्रपट

हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असून त्याचे टायटल आतापर्यंत ठरवले गेलेले नाही. याला रिभु दासगुप्ता दिग्दर्शक करणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची ही कहाणी एका घटस्फोटित तरुणीची आहे जी लंडनमध्ये राहते. ती रोज ट्रेनमधून आपल्या ऑफिस आणि घरापर्यंतचा प्रवास करते. योगायोगानं ट्रेन तिच्या जुन्या घराच्या जवळूनच जाते. पण एक दिवस तरुणी असे काही पाहते की, जे तिला हैरान करून टाकते. फिल्म याच घटनेबद्दल आहे.


एन्जॉय करणार नाही

या भूमिकेबद्दल परिणीती म्हणाली, माझ्यासाठी कॅरेक्टरच्या मूडमध्ये राहणे खूप गरजेचे आहे. इंग्लंडमध्ये चित्रपटाचे एकच शेड्यूल राहील. साधारणतः इंग्लंड माझ्यासाठी हॉलिडे स्पॉटसारखे असणार आहे. तिथे माझे खूप मित्र आहेत. पण यावेळी मी तिथे जराही एन्जॉय करणार नाहीये. माझे शेड्यूल केवळ सेटवर जाणे आणि हॉटेलमध्ये परत येणे असेल, यादरम्यान मला कॅरेक्टरवर काम करायचे आहे.’हेही वाचा -

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

आयुषमान खुराना साकारणार ‘गे’ ची भूमिका
संबंधित विषय
ताज्या बातम्या