Advertisement

'पीएम मोदी' विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

देशात लोकसभा निवडणूका सुरू असून या कालावधीत चित्रपट प्रदर्शित हेऊ नये असं आमचं मत आहे. चित्रपटाला आमचा विरोध नाही. मात्र, आता प्रदर्शित न करता निवडणूका संपल्यावर तो प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचं सतीश गायकवाड यांनी सांगितलं.

'पीएम मोदी' विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाला मोठा विरोध होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणूका सुरू आहेत. या निवडणूका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास सध्या स्थगिती द्यावी, असं याचिकाकर्ते आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी याचिकेत म्हटलं आहे. 


सोमवारी तातडीने सुनावणी 

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने  केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. 


५ एप्रिलला प्रदर्शित

देशात लोकसभा निवडणूका सुरू असून या कालावधीत चित्रपट प्रदर्शित हेऊ नये असं आमचं मत आहे. चित्रपटाला आमचा विरोध नाही. मात्र, आता प्रदर्शित न करता निवडणूका संपल्यावर तो प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचं सतीश गायकवाड यांनी सांगितलं. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. संदीप सिंग या सिनेमाचे निर्माते असून या सिनेमात विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय या सिनेमात बरखा बिष्ट, मनोज जोशी, बोमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आदी दिसणार आहेत.



हेही वाचा -

‘भारत’च्या ट्रेलरला एप्रिलचा मुहूर्त




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा