Advertisement

'८३'मधील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का?

सध्या एकीकडं जगभरातील क्रिकेटप्रेमींना विश्वचषकाचे वेध लागलेले असताना दुसरीकडं भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक पटकावणाऱ्या संघाची यशोगाथा पडद्यावर चितारण्याचंही काम सुरू आहे.

'८३'मधील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का?
SHARES

सध्या एकीकडं जगभरातील क्रिकेटप्रेमींना विश्वचषकाचे वेध लागलेले असताना दुसरीकडं भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक पटकावणाऱ्या संघाची यशोगाथा पडद्यावर चितारण्याचंही काम सुरू आहे. या चित्रपटातील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का?


सुवर्णक्षणाची सोनेरी गाथा

दिग्दर्शक कबीर खान मागील काही दिवसांपासून एका अशा चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे, जो एखाद्या व्यक्तीची जीवनगाथा नव्हे, तर '८३' या चित्रपटात एका सुवर्णक्षणाची सोनेरी गाथा रूपेरी पडद्यावर चितारणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगसह इतर कलाकारही कसून मेहनत करत आहेत. १९८३ मध्ये विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या खऱ्या खुऱ्या नायकांकडून त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत. खऱ्या जीवनातील आपल्या नायकाची प्रतिमा अचूकपणे पडद्यावर साकारता यावी यासाठी त्यांची शैली आत्मसात केली आहे. 


क्रिकेटर्सच्या गेटअपमध्ये

'८३'मधील या नायकांच्या टिमचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात सर्व कलाकार त्या काळातील क्रिकेटर्सच्या गेटअपमध्ये पहायला मिळत आहेत. या चित्रपटाची टिम लंडनमध्ये शूटिंग करण्यासाठी रवाना झाली आहे. तिथे या चित्रपटातील बरचसं शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या वेषातील हे कलाकार खऱ्या क्रिकेटर्सनाही यांचा हेवा वाटावा अशा कामगिरीवर जाण्यास सज्ज झाले असल्याची जाणीवच जणू हा फोटो करून देत आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

वेब सिरीजवर आधारलेल्या 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित

‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा