Advertisement

वेब सिरीजवर आधारलेल्या 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित

मालिकांच्या जोडीला आता वेब सिरीजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशाच गाजलेल्या 'गावाकडच्या गोष्टी' या वेब सिरीजवर आधारित असलेल्या 'संतुर्की' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

वेब सिरीजवर आधारलेल्या 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

माध्यम विश्वात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. मालिकांच्या जोडीला आता वेब सिरीजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशाच गाजलेल्या 'गावाकडच्या गोष्टी' या वेब सिरीजवर आधारित असलेल्या 'संतुर्की' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.


संत्या-सुरकीची गोष्ट 

गावातीलच मुलांनी बनवलेली 'गावाकडच्या गोष्टी' ही वेब सिरीज इतकी गाजली की, याचं दुसरं पर्वही आलं. या वेब सिरीजमधील संत्या आणि सुरकीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता हीच जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सरसावली आहे. 'संतुर्की' या आगामी मराठी चित्रपटात संत्या आणि सुरकीची गोष्ट पहायला मिळणार असल्यानंच चित्रपटाचं शीर्षक 'संतुर्की' असं ठेवण्यात आलं आहे. 'संतुर्की'चा ट्रेलर 'गावाकडच्या गोष्टी'च्या चाहत्यांसोबतच मराठी चित्रपटप्रेमींचंही लक्ष वेधून घेण्यास सज्ज झाला आहे.


ग्रामीण पार्श्वभूमी

'गावाकडच्या गोष्टी'चं दुसरं पर्व संपल्यानंतर आता या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या कथानकावर आधारित असलेला 'संतुर्की' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरी पाटी प्रोडक्शनच्या 'गावाकडच्या गोष्टी'मधील संत्या-सुरकी यांची प्रेमकथा या चित्रपटात आहे. अलिकडच्या काळात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या प्रेमकथांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणासाठी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या वेब सिरीजमध्ये गाजलेल्या एका जोडीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन पवार यांनी केलं आहे. 


सातारा जिल्ह्यातील कथानक

एखाद्या वेब सिरीजमधील मुख्य व्यक्तिरेखा घेऊन त्यावर चित्रपट बनवण्याचा मराठी मनोरंजन विश्वातील हा पहिला वहिला प्रयोग आहे. 'व्हॅलेंटाईन डे'चं औचित्य साधत 'संतुर्की'चा पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीजरमुळं प्रेक्षकांमध्ये 'संतुर्की'बाबत चांगलीच चर्चा रंगली. आता या 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानं प्रेक्षकांना चित्रपटाची झलक पहायला मिळत आहे. गावा-शहरांपासून ते सातासमुद्रापार 'गावाकडच्या गोष्टी'चा गाजावाजा झाला होता. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या या वेब सिरीजला जगभरातून प्रेम मिळालं. 


दिग्दर्शन, लेखन नितीन पवारांचं

'गावाकडच्या गोष्टी'मधील संत्या आणि सुरकी यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्तव त्याचं लग्न होऊ शकल नाही. लग्न होऊन गेलेली सुरकी जेव्हा पुन्हा संतोषसमोर येते, तेव्हा त्याची होणारी तगमग, तिच्या मुलानं मामा महटल्यावर होणारी गम्मत सगळ्यांना भावली, पण हे दोघेही एकमेकांपासून वेगळे का झाले हा प्रश्न सर्वांना सतावत होता. या प्रश्नाचं उत्तर 'संतुर्की' या चित्रपटात मिळणार आहे. या चित्रपटात संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी या मुख्य भूमिकेतील कलाकारांसोबत के. टी. पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळे हे कलाकारही आहेत. दिग्दर्शनासोबतच चित्रपटाचं लेखनही नितीन पवार यांनीच केलं आहे.

ट्रेलर :  https://www.youtube.com/watch?v=Vg9Tgp20K1o



हेही वाचा - 

‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के

छाया कदमची स्वप्नपूर्ती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा