क्रिकेट देवतेच्या रूपात सोनम कपूर

अभिनयापेक्षा आपल्या बडबड्या स्वभावामुळं नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर आता एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती चक्क क्रिकेट देवतेच्या रूपात चाहत्यांना दर्शन देणार आहे.

SHARE

अभिनयापेक्षा आपल्या बडबड्या स्वभावामुळं नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर आता एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती चक्क क्रिकेट देवतेच्या रूपात चाहत्यांना दर्शन देणार आहे.


मोशन पोस्टर लाँच

सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टरवर हसतमुख सोनम जणू क्रिकेट देवतेचं रूप लेवून प्रगटल्याचं दाखवण्यात आलं आहे. सोनेरी किनार असलेली आकाशी रंगाची नऊवारी साडी, पायात स्पोर्टस शूज, गळ्यात पुष्पहार, मोकळे सोडलेले केस, माथ्यावर बिंदीया, हाती हिरवा चुडा, उजव्या हातात हेल्मेट, तर डाव्या हातात क्रिकेटची बॅट असं सोनमचं रूप या मोशन पोस्टरमध्ये सादर करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टरमुळं चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.


कथानक कादंबरीवर आधारीत

आजवर क्रिकेट या खेळावर बरेच हिंदी चित्रपट बनले आहेत. हा चित्रपट मात्र राजपूत असलेल्या झोया सोलंकी या तरुणीची प्रेमकथा सांगणारा आहे. जाहिरात एजन्सीमध्ये एक्झीक्युटीव्ह असलेली झोया भारतीय क्रिकेट संघाच्या कप्तानाची भूमिका साकारणाऱ्या दुलकीर सलमानवर प्रेम करत असते. २०११ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ती भारतीय क्रिकेट संघासाठी लकी चार्म ठरते असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं कथानक लेखिका अनुजा चौहान यांच्या 'द झोया फॅक्टर' या कादंबरीवर आधारीत आहे.


दिग्दर्शन अभिषेक शर्मांचं

खरं तर सोनमसोबत दुलकीरचा फोटो रिव्हील झाल्यापासून सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता होती. पूर्वी आखलेल्या योजनेनुसार या चित्रपटाचा ट्रेलर जुलै अखेरीस रिलीज करण्यात येणार होता; परंतु काही कामं अपूर्ण राहिल्यानं प्रदर्शनाची तारीख २० सप्टेंबर करण्यात आली. या चित्रपटात सोनम आणि दुलकीरसोबत संजय कपूर, अभिलाष चौधरी, सिकंदर खेर, सौरभ शुक्ला, उदीत अरोरा, राहुल खन्ना, अंगद बेदी आदी कलाकार आहेत. नेहा राकेश शर्मा यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, संवाद प्रद्युमन सिंग यांचे आहेत. अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.हेही वाचा  -

ख्रिसमस पूर्वी अवतरणार चुलबुल पांडे

सुभाष घईंच्या 'विजेता'चा प्रवास सुरू
संबंधित विषय
ताज्या बातम्या