Advertisement

अजय दाखवणार भारतीय फुटबॅालचं सुवर्ण युग

आजवर बऱ्याच चित्रपटांनी इतिहासाची पानं उलगडत काळाच्या पडद्याआड दडलेल्या सोनेरी क्षणांची उजळणी केली आहे. आता अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अजय देवगण भारतीय फुटबॅालचं सुवर्ण युग रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अजय दाखवणार भारतीय फुटबॅालचं सुवर्ण युग
SHARES

आजवर बऱ्याच चित्रपटांनी इतिहासाची पानं उलगडत काळाच्या पडद्याआड दडलेल्या सोनेरी क्षणांची उजळणी केली आहे. आता अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अजय देवगण भारतीय फुटबाॅलचं सुवर्ण युग रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे.


कर्तृत्वाचे मौल्यवान क्षण 

इतिहासातील सोनेरी क्षणांची आठवण करून देणाऱ्या चित्रपटांची फार मोठी परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीला लाभली आहे. याच परंपरेत कधी चित्रपटसृष्टीतील सोनेरी क्षणांची आठवण करून दिली गेली आहे, तर कधी राजकारणातील... कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक मुद्दे, तर कधी खेळाच्या मैदानातील सोनेरी क्षणही चित्रपटांनी सादर केले आहेत. याच परंपरेचा पाईक बनत अजय देवगणही खेळाच्या मैदानावर भारतीय फुटबॅाल संघानं गाजवलेल्या कर्तृत्वाचे मौल्यवान क्षण सादर करणार आहे. अजय आपल्या आगामी चित्रपटात १९५२ ते १९६२ चा भारतीय फुटबॅालच्या इतिहासातील सुवर्ण काळ रेखाटणार आहे.


अनमोल अल्बम

अजयनं आजवर नेहमीच काहीसं हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनयात एकीकडं 'सिंघम'सारखा अॅक्शनपॅक्ड सिनेमा करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तर दुसरीकडं 'गोलमाल'सारख्या सिरीजमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. हा प्रोजेक्ट मात्र यापेक्षा खूप वेगळा आहे. यासाठी अजयला चक्क फुटबॅालच्या मैदानात उतरावं लागणार आहे. कारण या चित्रपटाचं शीर्षकच 'मैदान' असं आहे. या चित्रपटाची कथा भारतीय फुटबॅाल संघाच्या कामगिरीवर आधारित असल्याचं नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळंच हा चित्रपट म्हणजे केवळ एक कलाकृती ठरणार नसून तो भारतीय फुटबॅालमधील सोनेरी क्षणांचा एक अनमोल अल्बम ठरणार आहे.


पुढील वर्षी प्रदर्शित 

प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करणाऱ्या तसंच बॅाक्स आॅफिसवर अनपेक्षितपणं धडाकेबाज बिझनेस करणाऱ्या 'बधाई हो' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी 'मैदान'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, अंकुष चावला आणि अरुणवा जॅाय सेनगुप्ता करणार आहेत. झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात अजयसोबत किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून, पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.



हेही वाचा  -

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्ला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा