Advertisement

दोन गर्भवती महिलांमध्ये फसलेल्या अक्षयची फजिती ऐका

कोणत्या दोन महिलांमध्ये फसला अक्षय कुमार?

दोन गर्भवती महिलांमध्ये फसलेल्या अक्षयची फजिती ऐका
SHARES
Advertisement

अभिनेता अक्षय कुमार हा दोन गर्भवती महिलांमध्ये चांगलाच फसला आहे. नाही नाही काळजी करू नका. आम्ही त्याच्या चित्रपटाबद्दल बोलतोय. अक्षयच्या गुड न्यूज चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये दिसून येणाऱ्या दोन गर्भवती महिला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्या आहेत करिना कपूर आणि कियारा अडवणी

पोस्टरमध्ये एका बाजूला करिना कपूर आणि दुसऱ्या बाजूला कियारा अडवाणी दिसून येत आहे. या दोन्ही अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करत असून त्यांच्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि अक्षय कुमार फसलेले दिसत आहेत. अक्षयनं याचा पोस्टर शेअर करत चित्रपटाला गुफ-अप-ऑफ-द इयर असा टॅग दिला आहे. या चित्रपटाची कथा सरोगेसी मुद्द्यावर असणार आहे. सरोगेसी या विषयावर यापूर्वी २००२ मध्ये 'फिलहाल' नावाचा चित्रपट आला होता. त्याचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं होतं

चित्रपटात अक्षय कुमार आणि करिना कपुरची जोडी पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यापूर्वी हे दोघे २००९ मध्ये आलेला चित्रपट 'कमबख्त इश्क' मधून झळकले होते. 'गुड न्यूज' या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन यांनी केली आहे. हा चित्रपट क्रिसमसच्या वेळी म्हणजेच २७ डिसेंबरला प्रेक्षकांना पाहता येणार आहेहेही वाचा

'मर्दानी २' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित


संबंधित विषय
Advertisement