'मर्दानी २' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मर्दानी २' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत.

SHARE

राणी मुखर्जीचा २०१४ साली आलेला मर्दानी चित्रपट तर सर्वांच्याच लक्षात असेल. 'मर्दानी' हा हिंदी चित्रपट त्याच्या कथेमुळे आणि विशेष करुन अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहिला. तेव्हापासून या चित्रपटाच्या पुढच्या भागाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. लवकरच तिचा मर्दानी २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मर्दानी २ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे

'मर्दानी २' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत. मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणारा सिरियल किलर आणि या सिरीयल किलरला पकडण्यासाठी राणीची धडपड यात पाहायला मिळणार आहे. समाजातल्या विकृत मानसिकतेवर या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. राणीला चॅलेंज दिल्यानंतर राणी कशाप्रकारे या सिरीयल किलरला पकडते? तो सिरीयल किलर कोण असतो? कारण ट्रेलरमध्ये फक्त सिरीयल किलरचा आवाज ऐकू येत असल्यानं उत्सुक्ता अधिक वाढते. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिल्यानंतरच मिळतील


गोपी पुराथन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे १३ डिसेंबरला मर्दानी २ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे मर्दानी चित्रपटासारखा मर्दानी २ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो की नाही हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

राणी मुखर्जीनं 'मर्दानी' चित्रपट तिनं लग्नाआधी केला होता. लग्नानंतर तिनं काही काळ बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिच्या आई होण्याची बातमी देखील आली होती. बाळंतपणानंतर तिनं 'हिचकी' चित्रपटातून पुनरआगमन केलं. 'हिचकी'नंतरचा हा तिचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली आहे.हेही वाचा

लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा

मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा एकत्र


संबंधित विषय
ताज्या बातम्या