Advertisement

अभिनेता होण्यापूर्वी राजकुमार होता 'या' विषयाचा टिचर

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी राजकुमार शिक्षक होता. त्यामुळे त्याच्यासाठी छलांग चित्रपटातील टिचरची भूमिका साकारणं जास्त कठिण नाही.

अभिनेता होण्यापूर्वी राजकुमार होता 'या' विषयाचा टिचर
SHARES

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याचा आगामी चित्रपट ‘छलांग’मध्ये शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का? तो खऱ्या आयुष्यात शिक्षकच होता. हो अगदी बरोबर वाचताय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी राजकुमार शिक्षक होता. त्यामुळे त्याच्यासाठी ही भूमिका करणं जास्त कठिण नाही. शिक्षकाचा अनुभव त्याला आधीपासूनच आहे.


राजकुमारला आठवले शाळेतील दिवस

छलांग चित्रपटात राजकुमारसोबत पहिल्यांदाच 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटातील अभिनेत्री नुसरत भरूचा दिसणार आहे. या चित्रपटात मोंटू नावाच्या पीटी शिक्षकाची भूमिका राजकुमार साकारणार आहे. राजकुमारनं आपल्या पीटी शिक्षकाशी जोडलेल्या आठवणी शेअर करताना सांगितलं, मी ज्यावेळी शाळेत होतो तेव्हा नेहमी पीटीच्या तासासाठी उत्साहित राहायचो. शाळेतील सर्व शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करत होते त्याला एकजण अपवाद आहे कारण त्यांना माझे नृत्य आणि गाणे आवडत नव्हते. त्यांना असे वाटायचे की, मी फक्त खेळाकडे लक्ष द्यावं.‘


खऱ्या आयुष्यात होता शिक्षक

मी पदवीचे शिक्षण घेत असताना तीन महिन्यांपर्यंत ड्रामा शिकवत होतो आणि त्या तीन महिन्यांमध्ये मी एका नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. मी शिक्षकापेक्षा मित्रासारखा राहत होतो, कारण माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या वयात जास्त अंतर नव्हतं. मी कायम अभिनयाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या शोधासाठी कायम उत्साहित असायचो, असं राजकुमार एका मुलाखतीत बोलला


कधी प्रदर्शित होणार?

सोशल कॉमेडी असलेल्या 'छलांग'मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिका साकारत आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित आणि लव रंजन, असीम अरोरा आणि जीशान यांनी लिहिलेल्या 'छलांग' या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, लव रंजन और अंकुर गर्ग करत आहेत. १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


राव-हंसल जोडी

हंसल मेहता त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. आशयाला महत्त्व देणारा हंसल यावेळी राजकुमार राव यांच्यासोबत 'छलांग' मारण्यास तयार आहे. हरियाणामध्ये चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. शूटिंग अजून चालू आहे. राजकुमार राव देखील या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. त्यांचा असा दावा आहे की, हा चित्रपट चाहत्यांनाही आवडेल. आतापर्यत  बनवणाऱ्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा असल्याचा दावाही राव यांनी केला आहे.

राजकुमार राव शेवटचा मेड इन चायना या चित्रपटात झळकला होता. त्याच्यासोबत या चित्रपटात मोनी रॉय झळकली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावं तशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला छलांग चित्रपटाकडून अधिक अपेक्षा आहे.  



हेही वाचा

'तारक मेहता...' मालिकेशी संबंधित या व्यक्तीचा मृत्यू, शूटिंग देखील थांबवली

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा