Advertisement

राखी सावंतचा तनुश्री दत्तावर २५ पैशांचा मानहानीचा दावा

तनुश्रीने राखीवर १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. याला उत्तर म्हणून अाता राखीनेही तिच्यावर मानहानीचा दावा केला अाहे. सध्यातरी तनुश्रीवर २५ पैशांचा दावा पुरेसा असून अागामी काळात अाणखी जास्त पैशांचा दावा दाखल करेन असं राखीने म्हटलं अाहे.

राखी सावंतचा तनुश्री दत्तावर २५ पैशांचा मानहानीचा दावा
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंतवर अनेक अारोप करून मानहानीचा दावा दाखल केला अाहे. अाता राखी सावंतनेही तनुश्री दत्तावर २५ पैशाच्या मानहानीचा दावा दिंडोशी कोर्टात दाखल केला अाहे. तनुश्रीच्या अारोपामुळे अापल्याला त्रास झाल्याचं राखीने म्हटलं अाहे. 




२५ पैशांचा दावा पुरेसा 

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा अारोप केल्यानंतर राखीने पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीचे अारोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तर तनुश्री ड्रग्जच्या अाहारी गेली असल्याचा अारोपही राखीने केला होता. त्यानंतर तनुश्रीने राखीवर १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. याला उत्तर म्हणून अाता राखीनेही तिच्यावर मानहानीचा दावा केला अाहे. सध्यातरी तनुश्रीवर २५ पैशांचा दावा पुरेसा असून अागामी काळात अाणखी जास्त पैशांचा दावा दाखल करेन असं राखीने म्हटलं अाहे. 


तनुश्री समलैंगिक

राखी सावंतने नुकतंच अंधेरीतील लोखंडवाला येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राखीने तनुश्रीवर अनेक धक्कादायक अाणि खळबळजनक अारोप केले. तनुश्री समलैंगिंक असून स्त्रीच्या शरीरात एक पुरूष लपला अाहे. तिने १० वर्षांपूर्वी अापल्यावर बलात्कार केला, असा अारोप राखीने केला होता. 



हेही वाचा - 

सिद्धार्थ, रितेशसोबत तारा म्हणतेय ‘मरजावां’

मराठीकडे वळली संजूबाबाची पावलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा