Advertisement

'सिंघम'नंतर रोहित शेट्टी घेऊन येतोय 'सिम्बा'!


'सिंघम'नंतर रोहित शेट्टी घेऊन येतोय 'सिम्बा'!
SHARES

बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता अशी ओळख असणारा रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण या वेळी पद्मावती चित्रपटामुळे नाही, तर वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. निर्माता करण जोहरनं रणवीर सिंहचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये रणवीर पोलिसांच्या वेशात दिसत आहे. त्याच्या पिळदार मिशा तर लक्षवेधी ठरत आहेत. करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्या 'सिम्बा' चित्रपटात पोलिसांच्या वर्दीतील रणवीर आणि त्याचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.


रोहित शेट्टी आणि करण जोहरनं या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटानंतर करण जोहरचा २०१८ मधील हा दुसरा चित्रपट आहे. तर सिंघमच्या तोडीस तोड असा चित्रपट रोहित शेट्टी बनवण्याच्या तयारीत आहे.

आत्तापर्यंत अनेक वेगळ्या भूमिका रणवीरनं साकारल्या आहेत. पण पहिल्यांदाच रणवीर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरचा 'पद्मावती'देखील २०१८ साली प्रदर्शित होणार आहे. तर 'सिम्बा'देखील २०१८ मध्येच प्रदर्शित होणार आहे. सध्या रणवीरच्या 'पद्मावती' चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. पद्मावती चित्रपटात देखील रणवीर नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा रणवीर हटके भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहरनं बुधवारी संध्याकाळी ट्वीटरवर 'उद्या सकाळी मी एक मोठी घोषणा करणार' असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार करणनं सकाळी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं.   हेही वाचा

सैफ अली खानच्या 'कालाकांडी'चा ट्रेलर रिलीज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा